राजस्थानातील बारांच्या अटरू येथील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्रात, बंटी तिवारी या तरूणाने अशांतता निर्माण केली आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धमकावले. या गदारोळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अटरू पोलीस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मदा धर्मशाळेत लसीकरण सुरु होते, तेव्हा एक तरुण आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी त्याला घटनास्थळी हजर असलेल्या महिला परिचारिका व लस समन्वयक शिवराज मीणा यांनी रोखले. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना त्याने असभ्य भाषा वापरली. लसीकरण प्रभारी योगेश तिवारी यांनी ही माहिती विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.पी. यादव यांना दिली.