लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शहरातील अजिंक्य बाजार परिसरात गुरुवारी दुपारी अज्ञातांनी भर दिवसा युवकाचा खून केला.
इस्लामपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुरूवार हा बाजारचा दिवस असतो. रस्त्यावरच बाजार भरतो. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते. अशातच अजिंक्य बझार परिसरात नितिन पालकर या सराईत गुन्हेगाराचा भर गर्दीतच अज्ञातांनी खून केला. मयत नितीन पालकर याला पोलिसांनी मोक्का लावण्यात आल्याची चर्चाही घटनास्थळी होती.
मारेकरी कोण? कोणत्या कारणासाठी खून झाला, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.