उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरमधून अपहरणाच्या नाट्याची एक अजब घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका २० वर्षीय युवकाला आणि त्याच्या मित्राला स्वत:च्या अपहरण नाट्यासाठी अटक केली आहे. रिपोर्टनुसार, अमेठी मूळ निवासी जितेंद्र संगीत शिकण्याचं कारण सांगत २३ जानेवारीला वाराणसीकडे निघाला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे वडील सुरेंद्र कुमार यांना पैशांसाठी किडनॅपर्सचा फोन आला तर हे प्रकरण पोलिसात गेलं. त्यानंतर या सर्व नाट्याचा पर्दाफाश झाला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुल्तानपूरचे एसपी अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की जितेंद्र २३ जानेवारीच्या दुपारी वाराणसीला जाण्यासाठी निघाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांना किडनॅपर्सचा फोन आला. ते म्हणाला की, जितेंद्र त्यांच्या ताब्यात आहे. त्याला सोडवण्यासाठी १० लाख रूपये द्या. (हे पण वाचा : अनर्थ टळला ! आजीच्या सतर्कतेमुळे चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला)
चतुर्वेदी यांनी सांगितले की, 'तपासातून समोर आले की, पैसे मागण्यासाठी जितेंद्रच्या फोनचा वापर केला गेला होता. आम्हाला असंही आढळून आलं की, २४ जानेवारीच्या रात्री २ वाजता त्याच्या मोबाइलमध्ये नवं सिम टाकण्यात आलं होतं. पण पैशांसाठी फोन सकाळी ८ वाजता करण्यात आला. ज्यामुळे आम्हाला संशय आला'. ( हे पण वाचा : मुंब्रा येथील अपहृत मुलाची मध्य प्रदेशातून सुखरुप सुटका; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी)
तपासातून समोर आलं की, ज्या सिमवरून पैशांसाठी फोन करण्यात आला. ते सिम जितेंद्रचा मित्र रविच्या नावावर होतं. त्यानंतर पोलिसांची एक टीम शिवगढला गेली आणि त्यांना अटक केली. चौकशी दरम्यान जितेंद्रने मान्य केलं की, त्याने त्याच्या प्रेयसीच्या वडिलांना फसवण्यासाठी हे स्वत:चं अपहरण नाट्य रचलं होतं. कारण ते त्यांच्या प्रेमाच्या विरोधात होते.