ठाणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वसामान्यांच्या लोकलप्रवासावर बंद करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी अनेकजण नियम धुडकावून लोकलमधून प्रवास करत असतात. (Crime News) अशा प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेकडून तपासणी कडक करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे रेल्वेतील टीसी आणि प्रवाशांमध्ये खटके उडण्याच्या घटना घडत आहेत. अशाच तिकीट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी लोकलमध्ये टीसीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. (The youths attacked TC in a local due to a dispute over tickets and identity cards)
ही घटना दिवा रेल्वे स्थानकात घडली आहे. येथे तिकीट आणि ओळखपत्रारून टीसी आणि दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन या तरुणांनी ट्रेनमध्येच टीसीवर हल्ला केला. या हल्ल्यात टीसी जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याच्या कलमांतर्गत या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकऱणी दोन तरुणांना जीआऱपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल संजय शिंदे आणि हर्षल गिरीधर भगत अशी टीसीवर हल्ला करणाऱ्या तरुणांची नावे आहेत.