शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
3
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
4
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
5
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
6
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
7
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
8
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
9
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
10
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
11
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
12
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
13
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
14
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
15
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
16
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
17
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
18
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
19
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
20
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार

मृत्यूच्या १२ तास आधी युवकाची अखेरची पोस्ट; घरापासून ३५ किमी दूर सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 5:47 PM

इतकेच नाही तर वरदानला सोसायटीत प्रवेश कसा मिळाला? प्रत्येक सोसायटी गेटवर चौकशीनंतर आतमध्ये सोडलं जाते. बाहेरचा व्यक्ती असताना तो आत कसा गेला? असा सवाल युवकाच्या वडिलांनी विचारला आहे.

नवी दिल्ली - गाजियाबाद येथील आशियाना सोसायटीत मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास १४ व्या मजल्यावरून पडून वरदान शर्मा या युवकाचा मृत्यू झाला. त्याला कुणी पडताना पाहिलं नव्हतं. इन्स्टाग्रामवर मृत्यूच्या १२ तासआधी लिहिलेल्या पोस्टमध्ये गुड बाय जिंदगी असं मेन्शन केले होते. सुरुवातीला पोलिसांना ही आत्महत्या असल्याचं वाटलं परंतु आता त्याच्या नातेवाईकांनी युवकाची हत्या झाल्याचा दावा केलाय. 

पोलीस ही हत्या की आत्महत्या याचा शोध घेत आहेत. नातेवाईकांनी म्हटलंय की, दुकानातून घरी जातोय असं म्हणत बाहेर पडलेला युवक गोल्फ लिंकच्या आशियाना सोसायटीत कसा पोहचला? घरापासून ३५ किमी दूर सोसायटीत त्याच्या कुणीही ओळखीचं नाही. जर त्याला आत्महत्या करायची असती तर इतक्या दूर अज्ञात ठिकाणी का गेला? असा सवाल उपस्थित करत युवकाच्या वडिलांनी तक्रार देत ही हत्या असल्याचं म्हटलं आहे. 

सोसायटीत का गेला वरदान?युवकाचे वडील सुनील शर्मा म्हणाले की, मंगळवारी युवक त्यांच्या ऑप्टिकल्स दुकानात बसला होता. संध्याकाळी ५ च्या सुमारास दुकानातून घरी जातो सांगून तो निघाला. परंतु घरी पोहचलाच नाही. रात्री साडे नऊ वाजता माझ्या ओळखीच्या माणसाने गाजियाबादच्या आशियाना सोसायटीत वरदानसोबत दुर्घटना घडल्याची माहिती दिली. या सोसायटी ना कुणी नातेवाईक ना वरदानचा मित्र. मग तो तिथे गेला कसा आणि १४ व्या मजल्यावरून पडला कसा? असा सवाल त्यांनी केला आहे. 

इतकेच नाही तर वरदानला सोसायटीत प्रवेश कसा मिळाला? प्रत्येक सोसायटी गेटवर चौकशीनंतर आतमध्ये सोडलं जाते. बाहेरचा व्यक्ती असताना तो आत कसा गेला? त्याला कुणी बोलावलं होतं का? हे सगळं पोलीस चौकशीत समोर येणार आहे. तो १४ व्या मजल्यावर कसा पोहचला याचेही सत्य बाहेर यायला हवं असंही मृत युवकाचे वडील सुनील शर्मा म्हणाले. वरदान शर्मा हा बहिण शिवांगी आणि सिमरनहून छोटा होता. आई दिपा ही घटना घडली तेव्हा पंजाबला गेली होती. त्याठिकाणी भागवत कथा कार्यक्रम सुरू होता. मुलासोबत ही दुर्घटना घडल्याची बातमी ऐकताच ती परतली. मुलाच्या अचानक मृत्यूनं आईला मोठा धक्का बसला आहे.