नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी नांगलोई परिसरातून तीन गुन्हेगारांना रंगेहाथ अटक केली आहे. रात्रीच्या वेळी एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ड्रिल मशीन, स्क्रू ड्रायव्हर आणि अशा अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. ज्याचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी केला जात होता. या घटनेत एका अल्पवयीनाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांगलोई पोलीस ठाण्याला 2 मार्चच्या रात्री बँकेच्या मुख्यालयातून नांगलोई परिसरातील त्यांच्या एका एटीएममध्ये काही लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याचा फोन आला. याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष व पोलीस ठाण्याला मिळताच. या परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनांना तातडीने सतर्क करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पाहताच तिघे चोरटे एटीएममधून बाहेर पडले आणि वेगवेगळ्या दिशेने पळू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही अटक केली.
पोलिसांनी चोरट्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एटीएम फोडण्याची सर्व साधने जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी अल्पवयीन होता. उर्वरित दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. पोलिसांच्या सांगण्यानुसार,आरोपींची चौकशी केली असता ते सर्व बिहारमधील मुझफ्फरपूरचे रहिवासी असल्याचे समजले. तिघेही प्रेम नगर परिसरात भाड्याच्या खोलीत एकत्र राहतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिघांनीही यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर त्यांनी एटीएम फोडण्याचा कट रचला होता. ज्यावेळी तिघेही इलेक्ट्रिक वायर कापत होते, त्यावेळी बँकेच्या मुख्यालयात इमर्जन्सी कॉल आला, मुख्यालयाने तत्काळ पोलिसांना कळवले आणि या तिघांनाही अटक पोलिसांना करण्यात यश आले.