उमरगा : राज्यात कोरोनाचा संसर्ग सध्या कमी होत असला तरी उमरगा तालुक्यात मात्र कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. मंगळवारी ९० कोरोना बाधितांची भर पडली तर दोन दिवसांत १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या १३० झाली आहे.
उमरगा येथील खाजगी रुग्णालयात ९ तर उपजिल्हा रुग्णालयात पाच कोरोना बाधित रुग्णांचा दोन दिवसांत मृत्यू झाला. मुरूम ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी घेण्यात आलेल्या ८३ रॅपिड अँटीजेन टेस्ट पैकी २४ तर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या १११ रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये ३८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपजिल्हा रुग्णालयातून पाठवलेल्या ३० स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून, यातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात १०३, ईदगाह कोरोना केअर सेंटरमध्ये २५, शिवाई हॉस्पिटलमध्ये ३०, शेंडगे होसीपीटल येथे २५, शिवाजी कॉलेज हॉस्टेलमध्ये ३६, गजानन हॉस्पिटलमध्ये १०, डॉ. विजय पाटील हॉस्पिटलमध्ये १०, मातृछाया हॉस्पिटलमध्ये ९ तर होम आयसोलेशनमध्ये २०० रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके व वैद्यकीय अधिक्षक डॉ. वसंत बाबरे यांनी दिली.