उस्मानाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातील २० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी शुक्रवारी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय नवसा सुरवसे यांची उस्मानाबाद ग्रामीण ठाणे, पोनि इक्बाल शाबुद्दीन सय्यद यांची परंडा, पोनि सुरेश चाटे यांची उमरगा, पोनि रामेश्वर खनाळ यांची भूम,पोनि उमाशंकर कस्तुरे यांची उस्मानाबाद (शहर), पोनि भिमराव वेव्हळ यांची मंदिर सुरक्षा तुळजापूर, पोनि साईनाथ ठोंबरे यांची पोलीस कल्याण विभाग उस्मानाबाद, पोनि हर्षवर्धन गवळी यांची सुरक्षा शाखा उस्मानाबाद, पोनि हरिभाऊ खाडे यांची पोलीस ठाणे आनंदनगर, पोनि राजेंद्र मोताळे यांची पोलीस नियंत्रण कक्ष उस्मानाबाद, पोनि शशिकांत डोके यांची पोलीस नियंत्रण कक्ष उस्मानाबाद येथे बदली केली आहे.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये संदीप मोदे यांची जिल्हा विशेष शाखा (निवडणूक विभाग), प्रशांत पाटील, सूर्यकांत होगले यांची पोलीस नियंत्रण कक्ष उस्मानाबाद येथे बदली केली आहे. यासोबत पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुरेश शिंदे, गालीबखान हमीदखान पठाण, नंदकुमार दंडे, बजरंग सरपरे, निलकंठ सोनवणे, दत्तू जाधव यांची पोलीस नियंत्रण कक्ष उस्मानाबाद येथे बदली करण्यात आली आहे. बदल्यांचे सदरील आदेश पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहेत.