येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी ४४ रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १९ व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत किरणा, भुसार, जनरल स्टोअर्स, दूध विक्रते. बेकरी, स्विटमार्ट, चाट भांडार, पान मटेरियल विक्रेते व अनुषंगिक आस्थापना अशा ५० व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये तिघे कोरोना बाधित आढळून आले. गुरुवारी ४४ स्वॅब घेण्यात आले असून, यापूर्वी पाठवलेल्या ७७ स्वॅबचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर यांनी दिली. सध्या उपजिल्हा रुग्णालयात ४६ तर ईदगाह कोविड केअर सेंटरमध्ये २६ कोरोना रुग्ण आहेत. ४० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. गुरूवारी ३२ रुग्णांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी मुळज प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ तर नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १७ रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, येणेगूर आरोग्य केंद्रात झालेल्या २३ अँटीजेन टेस्टमधून नळवाडी व सुपतगाव येथील प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह आढळून असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुहास साळुंके व डॉ. साईनाथ जळकोटे यांनी सांगितले.