शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

५५ हजार उस्मानाबादकरांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला, एक कोटी रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:00 AM

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी उस्मानाबाद शहर वाहतूक शाखेच्या वतीने धडक कारवाईची मोहीम राबविली जात असते. गतवर्षी ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी उस्मानाबाद शहर वाहतूक शाखेच्या वतीने धडक कारवाईची मोहीम राबविली जात असते. गतवर्षी वाहने रस्त्यावर पार्क करणे, धोकादायकरित्या वाहन चालवणे, ट्रिपल सिट प्रवास, विनापरवाना वाहन चालविणे, वाहनचालविताना मोबाईलवर बोलणे, विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, आठवडी बाजार, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, राजमाता जिजाऊ चौक, नेहरु चौकात कारवाया केल्या जात असतात. गेल्या वर्षभरात नियमांचे उल्लंघन सुमारे ८० हजार वाहनचालकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. यातील २२ हजार ४२० वाहनचालकांकडून ५२ लाख ५७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ५५ हजार वाहनचालकांनी ना वाहतुकीचे नियम मोडून सुमारे १ कोटी रुपयांचा दंड थकविला आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मोहिम राबविली जात असली तरी दुसरीकडे वाहनचालक मात्र वाहतूक नियमांबाबत बेफिकीर असल्याचे आढळून येत आहेत.

कारवाई २२४२०

दंड ५२५७३००

पॉईंटर

अशी आहे कारवाई

नो पार्किंग

१६६९०

३३३८०००

धोकादाय वाहन

१७२

१७२०००

ट्रिपल सिट

२५०३

५००६००

विना परवाना

२०३९

१०१९५००

मोबाईलचा वापर

१०३६

२०७२००

कारवाई झालेले वाहनधारक

वाहनधारकांकडून वसूल केलेला दंड

चौकट...

तर वाहन परवाना रद्द

शासनाने घालून दिलेल्या वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियम मोडणार्यांकडून ठरावीक दंड वसल केला जातो. तो निर्धारित वेळेत न भरल्यास वाहन परवाना रद्द होऊ शकतो.

कोट...

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकरवर कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात ८० हजार वाहनचालकांवर कारवाई केली आहे.५५ हजाराच्या जवळपास वाहनधारकांनी दंड भरलेला नाही. वाहनचालकांनी वाहनावरील थकीत दंड भरण्यात यावा, जे वाहनचालक दंड भरीत नाहीत. त्यांना नोटीसा दिल्या जाणार आहेत.

इक्बाल सय्यद, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा