शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तालुक्यातील नाईचाकूर, उमरगा शहर व कोरेगाव येथील रुग्णांचा मृत्यू झाला. मुरूम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या ३७ रॅपिड अँटिजेन टेस्टपैकी ३ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात ५४ रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या असून, यामध्ये १२ व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या ६५ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ३१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून, तर २४ स्वॅबच्या अहवालात ११ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
सध्या तालुक्यात ४२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. उपजिल्हा रुग्णालयात ९१, ईदगाह कोरोना केअर सेंटरमध्ये १६, खासगी रुग्णालयात ३१, मुरूम कोविड केअर सेंटरमध्ये ८९, तर होम आयसोलेशनमध्ये ७० रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे यांनी दिली.