शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:03 IST

घाटातील एका वळणावर बस रस्त्यावरच उलटली असून सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत.

तुळजापूर (जि.धाराशिव) :पुणे जिल्ह्यातील मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली खाजगी बस बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या घाटात उलटली. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ जण गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मोशी येथील ४६ भाविकांना घेऊन एक खाजगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ६ वाजता तुळजापूरकडे रवाना झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तुळजापुरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या लोहिया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतले. यानंतर देवीचे दर्शन करुन सर्व भाविक त्याच बसने मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागले. मात्र, शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत. बसमधील सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत.

या जखमींना धाराशिवला हलवले...शांताबाई बाबू बोराटे, चंदा शिंदे, विजया दीपक साबळे, सुजित बोके, विहान शिंदे, भावना नाखाले, उषा सुग्रीव शिंदे, लक्ष्मी धोत्रे, राणी फडतरे, आशा रामकरे, सारिका कुटे, बसचालक ज्ञानेश्वर बारस्कर, मारुती दसने, राधाबाई पतंगलाड, मंदाकिनी म्हेत्रे, स्वरीत अल्लाट, रुपाली गायकवाड, सुशिला बोराटे, कल्पना भारत शेळके, सुनिता अशोक भोर यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तुळजापुरात प्रथमोपचार करुन धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर तुळजापुरातच उपचार सुरु आहेत.

भाजप कार्यकर्त्याचा उपक्रम...अपघातग्रस्त बसमध्ये तसेच काही जखमींकडे दर्शनाचे पास आढळून आले आहेत. त्यावर आयोजक म्हणून मोशी येथील सामाजिक कार्यकर्त्या सरिता तळेकर व योगेश तळेकर यांची फोटोसह नावे आहेत. शिवाय, पासवर भाजपचे कमळ चिन्हही छापले आहे.

टॅग्स :AccidentअपघातdharashivधाराशिवPuneपुणे