शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Published: August 28, 2023 7:15 PM

आई-वडील तसेच आजीही अपघातात मृत्यू पावल्याने दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत.

उमरगा (जि.धाराशिव) : श्रावण सोमवार निमित्त कर्नाटकातील अमृतकुंड येथे देवदर्शन आटोपून गावाकडे परतणाऱ्या एका कुटूंबियांच्या ऑटोला ट्रकने धडक दिली. यामध्ये चौघे जागीच ठार असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद मार्गावरील मन्नाळी येथे घडली.

उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथील सुनिल महादेव जगदाळे (३५) हे श्रावण सोमवारच्या निमित्ताने आई, पत्नी, मुलगी, भाची व अन्य दोघी, असे सात जण ऑटोरिक्षाने कर्नाटकच्या बसवकल्याण तालुक्यातील अमृतकुंड येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत गावाकडे निघाल्यानंतर सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मन्नाळी कॉर्नर येथे एका ट्रकने जगदाळे यांच्या ऑटोरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑटोरिक्षा दुभाजकावर चढला. त्याच क्षणी रस्त्यावर पडलेले प्रमिला सुनिल जगदाळे (३२) यांचा ट्रकखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. तर सुनिल जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे (७०), पूजा विजय जाधव (१७, रा. शहापूर, ता. तुळजापूर) या तिघांचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाय, गीता शिवराम जगदाळे (४०) या गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

लक्ष्मी सुनिल जगदाळे (८) व अस्मिता शिवराम जगदाळे (१०) या जखमी मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताचे वृत्त कळताच बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी अपघातस्थळी भेट दिली. तर उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

ट्रक चालक गेला पळून...रिक्षाला धडक दिल्यानंतर अपघाताची भीषणता पाहून ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. बसवकल्याणचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवमसु राजपूत, पोलिस निरीक्षक सुवर्णा मलशेट्टी, पोलिस हवालदार राजशेखर रेड्डी, मल्लीकार्जुन सलगरे यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींना उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. प्रभाकर बिचकाटे यांनी जखमींवर उपचार केले.

पती-पत्नीचा मृत्यू, मुले उघड्यावर...या अपघातात सुनील जगदाळे व त्यांची पत्नी प्रमिला हे दोघेही मयत झाले आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, हे दोघेही दहा वर्षाच्या आतील आहेत. आई-वडील तसेच आजीही अपघातात मृत्यू पावल्याने हे दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत.

टॅग्स :AccidentअपघातOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी