जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
उस्मानाबाद : तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ३० मे रोजी काक्रंबा येथे छापा टाकला. यावेळी लखन थोरात, विष्णू झाडे, आदित्य साबळे, बापू वडगावकर, नामदेव ढेरे, अमोल मस्के, फिरोज अन्सारी, सुरेश मस्के हे तेथील झोपडपट्टी परिसरात जुगाराचे साहित्य, भ्रमणध्वनी व रोख ७ हजार ३६० रुपयांसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
उस्मानाबाद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३१ मे रोजी शहरात जुगार खेळणाऱ्या दोघांवर कारवाई केली. आशिष नंदू सुरवसे व आश्रुबा दिलीप वारे (दोघेही रा. उस्मानाबाद) हे शहरात एका रुग्णालयासमोर झाडाखाली कल्याण मटका जुगार चालविण्याचे साहित्य व रोख रकमेसह या पथकास आढळून आले. पथकाने हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दोन कुटुंबांमध्ये झाली मारहाण
मुरूम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील सूर्यकांत विश्वनाथ माळी यांच्यासह चाैघे व जयाप्पा विश्वनाथ माळी यांच्यासह पाच जण अशा दोन कुटुंबांत ३० मे रोजी केसरजवळगा येथील शेतात खडी टाकणे व शेतरस्त्याने रहदारी करण्याच्या कारणावरून वाद झाला. यात दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी परस्परांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी सूर्यकांत माळी व जयाप्पा माळी यांनी दिलेल्या परस्परविरोधी दोन फिर्यादींवरून मुरूम पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू विक्री
ढोकी : रामवाडी येथील अविनाश अनिल माने हे ३० मे रोजी गावात पानटपरीसमोर देशी दारूच्या बाटल्यांसह ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुचाकी लंपास
उस्मानाबाद : शिंगोली तांडा येथील शामराव राठोड यांनी त्यांची दुचाकी २७ मे रोजी येथील न्यायायालयाच्या गेटसमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी येथील आनंदनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.