तुळजापूर : डॉक्टरांनी चुकीच्या पध्दतीने उपचार केल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी कारवाईची मागणी मयताच्या नातेवाईकांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील प्रकाश पुणेकर यांच्या मुलीला उपचारासाठी शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, येथील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने तिचा मृत्यू झाला असून, संबंधित डॉक्टर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांसह इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आई आत्मदहन करणार,असा इशारा नातेवाईकांनी या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मृत मुलीचे वडील प्रकाश पुणेकर, आई संजीवनी पुणेकर, मामा राम जाधव, आजी मंगला जाधव, मावशी वंदना कवडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत डॉ. दिग्विजय कुतवळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संबंधित रुग्णावर व्यवस्थित उपचार केले आहेत. त्या मुलीचा मृत्यू या रुग्णालयात नव्हे तर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात झाला आहे. मृत मुलीच्या नातवाईकांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हा त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून त्याचा अहवाल नातेवाईकांना सुद्धा दिला आहे.
100821\20210810_145554.jpg
तुळजापूर फोटो