विनामास्क घराबाहेर पडणे भाेवले
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. असे असतानाही अनेक लाेक विनामास्क रस्त्यावर वावरत आहेत. अशा १८ जणांविरुद्ध पाेलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापोटी सुमारे ९ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे.
साेशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, ५३४ जणांना दंड
उस्मानाबाद - काेराेनाच्या पार्श्वभूमीवर साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. असे असतानाही जमिनीवर खुणा न आखणे, दुकानासमोर गर्दी निर्माण केल्याप्रकरणी दुकानदारांसह ग्राहकांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. अशा ५३४ जणांकडून सुमारे १ लाख ७ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला. व्यापारी तसेच ग्राहकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय विवाहित महिला प्रातविधीसाठी गेली असता, गावातीलच एका पुरूषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच घटनेची काेणाकडे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ३१ मे राेजी घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
मंदिरापासून दुचाकी केली लंपास
उस्मानाबाद - लाेहारा तालुक्यातील तावशीगड येथील गजानन विठ्ठल पटवारी यांनी आपली दुचाकी गावातीलच महादेव मंदिराच्या पाठीमागे ३ मे राेजी उभी केली हाेती. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने सदरील दुचाकी लंपास केली. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर पटवारी यांनी लाेहारा पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध चाेरीचा गुन्हा नाेंद झाला.
पंधरा वर्षीय मुलीस पळवून नेले
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका गावातील पंधरा वर्षीय मुलीस फूस लावून गावातीलच तरूणाने पळवून नेले. ही घटना ३० मे राेजी घडली. याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांनी नजीकच्या पाेलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून संबंधित मुलाविरुद्ध १ जून राेजी भादंसंचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहे.