उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्यात सोमवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेत कार्यक्रम
उस्मानाबाद : येथील जिल्हा परिषदेत अध्यक्षा अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थितीत होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. चालूवर्षी विक्रमी वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी यावेळी केले. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुसर, कृषी विकास अधिकारी चिमण शेट्टे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मोहरे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता
शेगर, शाखा अभियंता ओ. के. सय्यद यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालय
उस्मानाबाद : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार संतोष पाटील, कुलकर्णी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कुलकर्णी, वाघमारे, अव्वल कारकुन नृसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी परिषद
उस्मानाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उस्मानाबाद शाखेच्यावतीने होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरमंत्री शिवानी परदेशी, तालुकाप्रमुख नीतेश कोकाटे, तुषार भातलवंडे, मारुती पांचाळ, गणेश खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खामसवाडी येथे अभिवादन
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, बाबा बडंगर, बाबूनाना शेळके, शंकर तांदळे, ज्ञानेश्वर बडंगर, दिलीप गर्जे, सावता माळी, सतीश वैद्य, शहाजी शेळके, सतीश माने, संदीप जाधव, खंडू भालेकर आदी उपस्थित होते.