भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी ८ ते १३ एप्रिल या कालावधीत कडक लाॅकडाऊन लागू केले आहे. या काळात पेट्राेलपंपही बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसाेय हाेऊ लागली आहे. त्यामुळे किमान शहरातील तरी पेट्राेलपंप सुरू ठेवावेत, अशी मागणी हाेत आहे.
काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन, वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेतील पेट्राेलपंपही बंद राहणार आहेत. याचा फटका रुग्णांसह नातेवाईक, पाेलीस, महसूल, आराेग्य कर्मचाऱ्यांनाही बसू लागला आहे. भूम शहरासह परिसरात सर्व साेयींनीयुक्त हाॅस्पिटल नाहीत. त्यामुळे रुग्णांना रेफर करण्याशिवाय स्थानिक डाॅक्टरांसमाेर पर्याय नसताे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना बार्शी, उस्मानाबाद, साेलापूर, बीड, पुणे आदी ठिकाणी न्यावे लागते. अशा ठिकाणी जायचे म्हटले की, वाहन लागते. वाहनांना इंधनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पंप बंद असल्याने अनंत अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील किमान तीन तरी पेट्राेलपंप सुरू ठेवावा, अशी मागणी हाेऊ लागली आहे.
चाैकट...
शेतकरीही अडचणीत...
सध्या शेतातील मशागतीची कामे सुरू आहेत. यासाठी बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करताहेत. मात्र, पेट्राेलपंप बंद असल्याने ट्रॅक्टरसाठीही इंधन मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, मशागतीची कामे बंद करावी लागली आहेत. त्यामुळे शहरातील पेट्राेलपंप सुरू ठेवावेत, अशी मागणी शेतकरी दादा आकरे यांनी केली आहे.
भूम तालुक्यात नसल्याने तालुक्यातील गंभीर रुग्णासाठी रेफर केल्याशिवाय प्रर्याय नाही, तर पुढील उपचार घेण्यासाठी बार्शी, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, पुणे या ठिकाणी डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार रुग्णास नातेवाईक यांना उपचारासाठी जावे लागते. अशा वेळी वेळेत दावखान्यात पोहोचण्यासाठी वाहनाशिवाय प्रर्याय नसतो. त्यामुळे पेट्रोलपंप बंद असल्याने गैरसोय होत आहे. त्यासाठी दिवसभर पंप सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी रुग्णाचे नातेवाईक यांच्याकडून होत आहे.
प्रशासनाने नगरपालिका हद्दीत असलेले पंप बंद राहतील, असा आदेश प्रशासनाने काढला आहे व
नगरपालिका हद्द संपल्यानंतर त्यापुढील १० किमीचे पंप दिवसभर सुरू राहतील असा आदेश काढला आहे. वास्तविक भूम शहराच्या परिसरात असणारे तीनही पेट्रोलपंप नगरपालिका हद्दीत आहेत. त्यामुळे हे तीनही पंप बंद राहिले तर बार्शी, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, पुणे येथे रुग्णास पुढील उपचारास जायचे झाल्यास विना डिझेल विना पेट्रोल कसे जायचे, शिवाय सध्या खरीप हंगाम पूर्वतयारी सुरू असून शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरट केली जाते. त्यामुळे डिझेलअभावी शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे न. प. हद्दीतील तीनही पंप सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
सध्या माझ्या शेतात नांगरट सुरू आहे; परंतु डिझेल नसल्यामुळे नांगरट बंद करावी लागत आहे. त्यासाठी पंप सुरू करून गैरसोय दूर करावी.
-दादा आकरे, शेतकरी, भूम