उस्मानाबाद जिल्हा खासगी पशू चिकित्सक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. जहांगीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी डॉ. धर्मराज शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. रामबिलास तापडिया तसेच संघटक म्हणून डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. धनराज चंदनशिवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीमध्ये पशू चिकित्सा व्यवसायी संघटनेचे संपूर्ण राज्यात तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात चालू असलेल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्याचे ठरले असून, आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात दिनांक १६ जुलैपासून पूर्णपणे काम बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. या बैठकीस डॉ. एस. एस. दराडे, डॉ. आवाळे, डॉ. सोनटक्के, डॉ.माळी यांच्यासह तालुक्यातील सर्व खासगी पशुवैद्यक उपस्थित होते
130721\img-20210712-wa0093.jpg
कळंब तालुका खाजगी पशुचिकित्सक व्यावसायिक संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ जहागीर शेख, डॉ रवि ढवळे, डॉ धर्मराज शिंदे आदी उपस्थित होते