शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव; गावातील टीव्ही, मोबाइल रोज दोन तास बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:14 PM

मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूर ग्रामपंचायतीचा ठराव

समीर सुतके उमरगा (जि. उस्मानाबाद) : टीव्हीवरच्या मालिका, हातातील मोबाइल यातच अनेकांचे आयुष्य गुरफुटून गेले. याचा परिणाम कुटुंबाबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको, यासाठी अख्ख्या गावातील मोबाइल आणि टीव्ही सायंकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत बंद ठेवण्याचा ठराव जकेकूरवाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे. यासाठी दररोज भोंग्याच्या माध्यमातून आठवण करून दिली जात आहे.

नव्या साधनांचा दुष्परिणाम विविध माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. या परिणामांच्या पार्श्वभूमीवर जकेकूरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांनी विशिष्ट टीव्ही मालिका आणि मोबाइलमुळे मुलांच्या अभ्यासावर अधिक परिणाम होत असल्याचे सांगत ही साधनेच दररोज दोन तास बंद ठेवण्याचा निर्धार केला. ग्रामसभेत हा विषय घेण्यात आला तेव्हा सर्वसंमतीने तो मंजूरही करण्यात आला. यामुळे गावात सायंकाळी सहा ते रात्री आठ यादरम्यान प्रत्येक घरातले टीव्ही आणि मोबाइल बंद करून मुलांच्या अभ्यासासाठी वेळ राखीव करण्यात आला आहे. दररोज ठरलेल्या वेळेत टीव्ही आणि मोबाइल बंद करण्यासाठी आठवण करून देण्यास ग्रामपंचायतीवर भोंगाही लावला आहे. तसेच या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होऊन गुणवत्ता वाढीस हातभार लागेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. 

मुलांना अभ्यासाची सवय लागावी. टीव्ही व मोबाइलसारख्या गोष्टींपासून त्यांना ठरावीक वेळ तरी दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. यावेळी सर्व नागरिकांनी आपले टीव्ही, मोबाइल, रेडिओ, लाऊडस्पीकर बंद करायचे व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे, असे सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने ठरले आहे. या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.- अमर सूर्यवंशी, सरपंच, जकेकूरवाडी

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाOsmanabadउस्मानाबाद