कळंब : येथील नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पिय सभेत २ लाख ५८ हजारांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. यात कसलीही नवीन करवाढ करण्यात आली नाही.
विशेष सर्वसाधारण सभेत स्थायी समितीने शिफारस केलेले ४४ कोटी ६१ लाख ४५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक किरकोळ बदलासह मांडण्यात आले. यावर साधकबाधक चर्चा झाली. या अंदाजपत्रकात बिअर बारच्या नाहरकतसाठी ३० ऐवजी ३५ हजार रुपये व दवाखाना नाहरकतसाठी ५ ऐवजी ६ हजार रुपये नाहरकत फी, एवढाच फेरबदल करण्यात आला आहे. इतर कुठलीही करवाढ नसलेले हे अंदाजपत्रक सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीस नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, उपाध्यक्ष संजय मुंदडा, प्रभारी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्यासह, न. प. सदस्य व अधिकारी उपस्थित होते.