अवैधरीत्या दारू विक्री, गुन्हा दाखल
उस्मानाबाद : शहरातील भानूनगर भागातील मनाेजकुमार सुभाष पापडे हा १३ जुलै राेजी बावी फाट्याजवळील रानवारा हाॅटेलच्या मागे देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने छापा मारला असता, पापडे याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून देशी दारूच्या जवळपास १३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पापडे याच्याविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
विनामास्क वावरले, दंड वसूल
उस्मानाबाद : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. असे असतानाही अनेक जण विनामास्क वावरत आहेत. अशा व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. १४ जुलै राेजी जिल्ह्याच्या विविध भागांत सहा जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून ३ हजार रुपये दंड वसूल केला.