सुनील केदार तुळजापूर येथे दौऱ्यानिमित्त आले असता भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव, संघटनेचे सचिव प्रवीण जाधव, पं. स. सदस्य गजेंद्र जाधव, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव योगेश थोरबोले, अजिंक्य वराळे आदींनी हे निवेदन दिले. यात सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांच्या सर्व राज्य क्रीडा मार्गदर्शकांची पदे रिक्त असून खो-खो, ॲथलेटिक्स, आर्चरी, व फुटबॉल या क्रीडा प्रकारांचे मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावरील मागील अनेक वर्षांपासून नादुरुस्त जलतरण तलावासाठी निधी उपलब्ध करून देणे, बीओटी तत्वावर बांधण्यात आलेले वसतिगृह मागील अनेक वर्षांपासून विकासकाने संकुल समितीकडे हस्तांतरित केले नसल्यामुळे विविध स्तरावरील स्पर्धा आयोजन बाबतीत अनेक अडचणी निर्माण होत असून या बाबतीत लक्ष घालून अडचण सोडविण्याची मागणी निवेदनात करण्यात अली आहे, महाराष्ट्रात खेलो इंडियाचे किमान १०० प्रशिक्षण केंद्र उभारणी बाबतीत प्रयत्न करणे, शिवछत्रपती व अर्जुन क्रीडा पुरस्कारार्थींना राज्य सरकारने थेट नोकर भरती करणे, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या निधीत वाढ करणे यासह राज्य क्रीडा परिषदेचे नव्याने पुनर्गठन करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.
क्रीडा समस्यांबाबत मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:24 AM