कळंब : पुरस्कार माणसाला मोठेपण तर देतोच, शिवाय जगण्यासाठी ऊर्मीदेखील देतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी केले.
कळंबचे सुपुत्र तथा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना मुंबई येथील आचार्य अत्रे स्मारक समितीचा मानाचा असा स्व. काकासाहेब पुरंदरे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यानिमित्त कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभय देशपांडे यांचा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे हे होते. यावेळी कोरोना झाल्यानंतरचे अनुभव शब्दबद्ध केलेल्या सतीश टोणगे यांच्या ‘मी पॉझिटिव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अभय देशपांडे यांनी आपल्या मनोगतात ज्याची जन्मभूमीशी नाळ जोडली गेली आहे, तो नेहमीच यशस्वी होतो. हा सत्कार नेहमीच मला बळ देणारा, लिखाणासाठी आणखी प्रोत्साहन देणारा असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक अशोक शिंदे, सूत्रसंचलन प्रा. जगदीश गवळी यांनी केले. आभार परमेश्वर पालकर यांनी मानले. यावेळी शीतलकुमार घोंगडे, बालाजी सुरवसे, रमेश अंबिरकर, ओंकार कुलकर्णी, सतीश टोणगे, प्रतीक टोणगे, समर्थ टोणगे, दिलीप गंभीरे, किरण राजपूत, अशोक काळे, उपस्थित होते.