ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती घालण्यासाठी बेसिक कन्सेप्ट दहीफळ येथील जि.प. प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. लिफ फाॅरवर्ड या संस्थेने इंग्रजी साक्षर कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला आहे. उपक्रमात १६० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील तीन विद्यार्थ्यांना सुवर्णस्तरीय प्रमाणपत्र मिळाले आहे. यात अर्पिता अरविंद कुठे, विठ्ठल कैलास कुठे, सुमित मनोज वाघमारे यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. दरम्यान, या विद्यार्थ्यांना शंकर सावंत, गोपीनाथ पाखरे, मुख्याध्यापक दत्तात्रय वनवे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल दहीफळ येथील प्रशालेस बेस्ट स्कूल हा पुरस्कारही देण्यात आला. याबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वस्तरातून काैतुक हाेत आहे.
090721\img-20210709-wa0047.jpg
.प.प्रशालेस शिका व शिकवा उपक्रमांतर्गत बेस्ट स्कूल अवार्ड पुरस्कार मिळाला