बलसूर - उमरगा तालुक्यातील बलसूर ते रामपूर हा रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे येथून ये-जा करताना ग्रामस्थांना गैरसाेयीचा सामना करवा लागत आहे.
रामपूर ते पेठसांगवी या तेवीस किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन वर्षापूर्वी डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे सदरील मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली असून, ती साइड पट्ट्यांवर आली आहे.
परिणामी येथून ये-जा करताना वाहनधारकांसाेबतच शेतकऱ्यांनाही गैरसाेयीला ताेंड द्यावे लागत आहे. काटेरी झुडपे ताेडण्यात यावीत, यासाठी मागील वर्षभरापासून शेतकरी पाठपुरवा करीत आहेत. परंतु, अद्यात हा प्रश्न सुटलेला नाही. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी दत्तात्रय भोसले, बिभीषण शेके, सतशी कोळी, दगडू मोहळे आदींनी केली आहे.