नाग (नागराज) : जो फणा काढून उभा राहतो तो नाग, जोरात फुत्कार, फुस्स असा सारखा आवाज आल्यास जवळ नाग आहे असे समजावे.
मण्यार : काळपट नीळसर रंग, अंगावर पांढरे पट्टे, शेपटीकडे अधिक डोक्याकडे कमी होत जातात हा साप इतर सापांना खातो.
फुरसे : फूटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टीसारखे नक्षीकाम, डोक्यावर बाणासारखी खूण, दंश करताना जिलेबीसारखा आकार करून शरीर एकमेकावर घासतो आणि करवतीसारखा करकर आवाज करतो.
घोणस : हा साप कुकरच्या शिट्टीचा आवाज काढतो, अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे ठिपके असणाऱ्या रेषा असतात, डोक्यावर इंग्रजी व्ही अक्षर असते.
जिल्ह्यात आढळणारे विनविषारी साप
जिल्ह्यात केवळ चार साप विषारी आढळून येतात. तर मांजऱ्या व हरणटोळ हे दोन साप निम्नविषारी आहेत. धामण, कड्या, तस्कर, गवत्या, पांदीवड, नानीटी हे साप बिनविषारी आहेत. मात्र, नागरिक साप म्हटले की सर्वच साप विषारी समजून त्यांना इजा पोहोचवित असतात. साप हे जीवसृष्टीतील महत्त्वाचा असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.
साप आढळला तर
शेतात तसेच रस्त्याला साप आढळून आला तर नागरिकांनी त्यास इजा न पोहोचविता जाऊ द्यावे.
घरात साप आढळून आला तर त्याच्यापासून ५ ते ६ फूट अंतर राखून उभे राहावे.
घोणस जातीच्या सापाला डिवचल्यानंतर तो मानवावर हल्ला करू शकतो.
घराच्या परिसरात नाग आढळून आला तर ज्या ठिकाणाहून साप येण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी रॉकेल आणि पाणी शिंपडावे.
साप चावला तर
चार विषारी व दोन निम्नविषारी साप आहेत. हे साप चावले तर नागरिकांनी प्रथाेमपचार न करता थेट नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. नागरिकांना कोणता साप विषारी व कोणता बिनविषारी साप आहे. याबाबत माहिती नसते. त्यामुळे जागा घट्ट बांधणेही चुकीचे ठरू शकते. तसेच साप चावल्यानंतर नागरिकांचा भीती पोटीच मृत्यू होता. त्यामुळे साप चावल्यानंतर भीती न बाळगता रुग्णालय गाठणे सोयीचे ठरते.
कोट...
साप तिन्ही ऋतूत आढळून येतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे या चार विषारी प्रजाती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेतात काम करताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी. तसेच मानवी वस्तीत साप आढळून आल्यानंतर त्यास इजा न पोहोचविता सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
अक्षय माने, सर्पमित्र