‘भाजयुमाे’ आक्रमक, धाराशिवमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जाेडे मारले

By बाबुराव चव्हाण | Published: May 24, 2023 04:22 PM2023-05-24T16:22:16+5:302023-05-24T16:22:42+5:30

राहुल गांधींची शिवरायांशी तुलना केल्याचा आराेप

'BHAJUMA' Aggressive, Dharashiv's image of Rahul Gandhi was overshadowed | ‘भाजयुमाे’ आक्रमक, धाराशिवमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जाेडे मारले

‘भाजयुमाे’ आक्रमक, धाराशिवमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जाेडे मारले

googlenewsNext

धाराशिव :काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारा ‘व्हिडिओ पोस्ट’ करण्यात आला आहे. आपले नसलेले कर्तृत्व उठावदार दिसण्यासाठी केलेला हा खटाटाेप निव्वळ बालीशपणाचे लक्षण असल्याचा आराेप करीत शनिवारी धाराशिव शहरात भारतीय जनता युवा माेर्चाच्या पदाधिकार्यांनी प्रतिमेस जाेडे मारत निषेध नाेंदविला.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची राहुल गांधी यांच्यासारख्या कर्तत्व नसणाऱ्या नेत्याशी तुलना हाेऊच शकत नाही. असे असतानाही काॅंग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ‘व्हिडीओ पाेस्ट’ करून दुस्साहस केले आहे. आपले नसलेले कर्तृत्व उठावदार दिसण्यासाठी शिवबांच्या कार्याशी केलेली तुलना हा निव्वळ बालीशपणा असल्याचे सांगत ‘भाजयुमाे’ने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात शनिवारी सकाळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जाेडे मारले.

तसेच या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध नाेंदविला. या आंदाेलनामध्ये भाजयुमाेचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, सुनिल काकडे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, बाजार समिती संचालक दत्ता देशमुख, अमोल राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, प्रकाश तावडे,भास्कर बोंधर, वैभव हंचाटे, राहुल शिंदे,स्वप्निल नाईकवाडी, ओम नाईकवाडी, सुधीर भोसले, अमित कदम, हिम्मत भोसले, सचिन लोंढे,रोहित देशमुख, सुनिल पुंगुडवाले, श्रीराम मुंबरे , गणेश एडके, देवकन्या गाडे, धनराज नवले, ओंकार देवकते, ज्ञानेश्वर सुळ, सार्थक पाटील आदी सहभागी झाले हाेते.

Web Title: 'BHAJUMA' Aggressive, Dharashiv's image of Rahul Gandhi was overshadowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.