शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

देवेंद्र फडणवीसांना CM करण्यासाठी भाजप आमदाराचे आई भवानीला साकडे; नवस फेडण्यासाठी निघाले चालत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:52 IST

मुख्यमंत्री फडणवीसांसाठी देवीला साकडे घालणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांची तुळजापूरची पायी वारी

MLA Abhimanyu Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताच भाजप आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं. लोकसभेतल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार मुसंडी मारली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. यामध्ये औसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीला नवस केला होता. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिमन्यू पवार हे नवस फेडण्यासाठी पायी तुळजापूरला निघाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, मी तुझ्या चरणी माथा टेकवण्यासाठी परत पायी चालत येईन, असा नवस आमदार अभिमन्यू पवार यांनी २०२१ साली केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे आता अभिमन्यू पवार यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी केलेला नवस पूर्ण करण्याचे ठरवलं आहे. आई जगदंबेच्या चरणी  नतमस्तक होण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून औसा ते तुळजापूर पायी जात आहेत.

मराठवाड्याचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाकडे पाहिले जाते. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावेत, अशी माझी अपेक्षा होती. यामुळे आई तुळजाभवानीला मी नवस केला होता, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटलं. औसा ते तुळजापूर हे जवळपास ५९ किमीचे अंतर अभिमन्यू पवार हे चालत पार करणार आहेत. १ जानेवारी पासून अभिमन्यू पवार यांनी तुळजापूर नवसपूर्तीची पदयात्रेला सुरुवात केली आहे. तर ३ जानेवारी ही पदयात्रा तुळजापूरात पोहोचणार आहे.

दरम्यान, अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या अभिमन्यू यांना देवेंद्र फडणवीस यांनी औसाचे आमदार केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांनी साकडे घातले होते. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसabhimanyu pawarअभिमन्यू पवारausa-acऔसाBJPभाजपा