उस्मानाबाद -केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने बुधवारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजीदेखील केली.
माेदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली हाेती. त्यांना रात्री उशिरा जामीन मिळाला. यानंतर बुधवारी सकाळी जिल्हा भाजपाच्यावतीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विराेधात जाेरदार निदर्शने करण्यात आली. आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आराेप आहेत. काहींवर अन्य प्रकारचे गुन्ह आहेत. असे असतानाही संबंधित मंडळी माेकाट फिरत आहे. अशा लाेकांना अटक न करता, एका वक्तव्यास विपर्यास करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. ही एकप्रकारची हुकूमशाही असल्याचा आराेपही त्यांनी केला. आंदाेलनात माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील, ॲड.खंडेराव चौरे, ॲड. नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, राजाभाऊ पाटील, रामदास कोळगे, सुनील काकडे, प्रवीण सिरसाठे, अभय इंगळे, प्रवीण पाठक, संजय लोखंडे, बालाजी गावडे, पांडुरंग लाटे, संदीप कोकाटे, विनोद गपाट, विनायक कुलकर्णी, नामदेव नायकल, अमोल राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, ओमप्रकाश मगर, नीलकंठ पाटील, अभिराम पाटील, राहुल शिंदे, ओम नाईकवाडी, गणेश एडके, हिम्मत भोसले, प्रीतम मुंडे, विजय हौळ, शहाजी वाघ, सुरज शेरकर, वैभव हांचाटे, गणेश देशमुख, गणेश इंगळगी, विशाल पाटील, अजय यादव, राज निकम, प्रेम पवार, मेसा जानराव, संदीप इंगळे, गणेश मोरे, अमित कदम, सुनील पांगुडवाले, गिरीश पानसरे, सागरसिंह ठाकूर, सागर दंडणाईक, तेजस सुरवसे, कमलाकर दाणे आदी सहभागी झाले हाेते.