यावेळी भाजपा जिल्हा उपाघ्यक्ष विक्रमसिंह देशमुख भाजपा, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, आनंद कंदले, जि.प. सदस्य, राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे, नारायण नन्नवरे, गुलचंद व्यावहारे, साहेबराव घुगे, गणेश सोनटक्के, बाळासाहेब शामराज, काटीचे सरपंच आदेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनामुळे जवळपास अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात बापुसाहेब कणे, जि.प. सदस्य शहाजी लोंढे, मारुती रोकडे, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, ज्ञानेश्वर माळी, बाबासाहेब गुंड, नरसिंग धावणे, बाळासाहेब भाले, मनोज धावणे, रामलिंग सगर, पद्माकर मुळे, हरिभाऊ काळदाते, ज्ञानेश्वर गंजे, विजय निबांळकर, गुलचंद व्यावहारे, सुहास साळुके, लक्ष्मण शेंडगे, रवी मगर, विश्वास मगर, सुलेमान शेख आदी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलीस अधिकारी २२ पोलीस अंमलदार, १९ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन संपल्यानंतर अडवून ठेवलेली चारशे वाहने टोल न भरता सोडून दिली. यावेळी ३० आंदोलकांना कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली. आंदोलनस्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप व तलाठी हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
तामलवाडी येथे भाजपाचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:21 AM