उमरगा : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, डॉ. दामोदर पतंगे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, विवेक हराळकर, ॲड. दिलीप सगर, अमर देशटवार, शांतीदूत परिवाराचे जिल्हाध्यक्ष प्रा. जीवन जाधव, समर्थ शांतीदूत परिवाराचे जिल्हाध्यक्ष ईश्वर मुंगळे, विक्रम पाचंगे, विठ्ठल गरूडझेप फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश गरूड, श्रीकृष्ण रक्तपेढीचे सचिव प्रा. अभयकुमार हिरास आदी उपस्थित होते.
गरूड यांचा पुरस्काराने सन्मान
(फक्त फोटो : गुणवंत जाधवर २७)
उमरगा येथील गरुडझेप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरहरी गरूड यांना विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव आणि विद्याताई जाधव यांच्या हस्ते ‘शांतिदूत सेवारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
अध्यक्षपदी आरेफ मिर्झा
(फोटो : उन्मेष पाटील २७)
कळंब : येथील सम्राट ग्रुप व आझाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी आरेफ मिर्झा यांची निवड करण्यात आली. नगरसेवक श्रीधर भवर, तारेख मिर्झा, बाळकृष्ण भवर, मोसीन मिर्झा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. समितीच्या उपाध्यक्षपदी सौरभ मुंडे, सचिवपदी अजय जाधव यांची निवड करण्यात आली.
स्मारकाचे काम चालू करण्याची मागणी
कळंब : कसबे तडवळे शाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिस्तंभ व ग्रंथालयाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष किरण मस्के, भाऊसाहेब कुचेकर, प्रणव गायकवाड, समीर मस्के, वसंत ताकतोडे, शंकर टोपे, बापू सावं, प्रल्हाद पडेकर, शिवाजी सावंत, तेजस भालेराव, संजय सोनवणे, दत्ता निकाळजे, वैभव भालेराव, विश्वजीत भालेराव, अजित सोनवणे, रुकसाना बागवान, सौदागर भाभी आदींच्या सह्या आहेत.