जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस उपाधीक्षक मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे स.पो.नि. वैभव नेटके, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोडसे, अनंत तांबारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. दिवसभर रक्तदानाचा महायज्ञ शिराढोण व परिसरातील ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून सुरूच होता.
स.पो.नि. वैभव नेटके हे पूर्वी शिक्षकी पेशात होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ते पोलीस खात्यात रुजू झाले. सध्या सहायक पोलीस निरीक्षक पदावर काम करत असले तरी शिराढोण व परिसरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी नेहमीच मदत करत आहेत. त्यांच्या या कार्यशैलीमुळे अनेक युवक त्यांच्या नेहमीच संपर्कात आहे. रक्तदानाच्या आवाहनानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
260721\0317img20210726100015.jpg
शिरा डॉन रक्तदान फोटो