उस्मानाबाद - नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये सकाळी पावणेदहाच्या सुमारास 7 ते 8 मुले नदीत बुडाल्याची दुर्घटना घडली. येथील बोरी नदीमध्ये फरुख नय्यरआझम काझी यांचे कुटुंब बोटीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटत असताना अचानक बोट पलटी झाली. या बोटीत 9 प्रवासी होते.
बोरी नदीतील या बोटीत चालकासह 10 प्रवासी होते. त्यापैकी 7 जण पाण्यातून जिवंत सुखरुप बाहेर आले, तर 3 प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हिजहान एहसान उल्हास काझी (वय 4), अलमश शफीक जहागीरदार (वय 9) तर सानिया फारूख काझी (वय 8) या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एक मुलगी पाण्यातून बाहेर काढून उपचारादरम्यान दवाखान्यात मरण पावली तर 2 मुले पाण्यातच बुडून मयत झाले आहेत. त्यापैकी एका मुललीला पाण्यातून 12:20 वाजता बाहेर काढण्यात आले व आखणी एक मुलगा पाण्यात असून त्याला बाहेर काढण्याचे शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मृतांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत पाच जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांनी दिली.
- नळदुर्ग पोलीसांनी दिली घटनास्थळाला भेट- मृत सर्वजण नळदुर्ग शहरातील मुले- बोटिंग करण्यासाठी गेलेल्या 8 जणातील तिघांचा मृत्यू