भूम तालुक्यामध्ये शिवसंपर्क अभियानांतर्गत तालुक्यातील पाथरुड सर्कलमधील पाथरुडसह तिंत्रज, आंबी, जेजला या गावांना भेटी देऊन कार्यकर्ते, ग्रामस्थांशी बोरकर यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक गावातील शाखेची पुनर्बांधणी तसेच शाखा संघटन प्रबळ करण्यासाठी शिवसैनिकांनी सभासद नोंदणीवर भर द्यावा. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे व त्याचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. तसेच या दरम्यान हाडोंग्री येथील ध्यान केंद्रास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते तुळजाभवानी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच जेजला येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले. नळी वडगाव येथील ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमास भेट देऊन त्यांनी देणगी स्वरूपात मदतही केली.
बोरकरांनी साधला कार्यकत्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:33 AM