उस्मानाबाद -तालुक्यातील उपळा (मा.) येथील घर फाेडून अज्ञात चाेरट्यांनी चक्क साैंदर्य प्रसाधनांवर डल्ला मारला. यासाेबतच कपाटातील २० हजारांची राेकडही लांबविली. ही घटना १२ ते १४ मार्च या कालावधीत घडली. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाेरटे अधिक सक्रिय झाले आहेत. हे चाेरटे काय चाेरून नेतील हे सांगता येत नाही. त्याचे झाले असे, उपळे (मा.) येथील निर्मला बिभीषण काकडे या १२ ते १४ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेल्या हाेत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद हाेते. हीच संधी साधत अज्ञाताने घराच्या दरवाजावरील कुलूप ताेडून आत प्रवेश मिळविला. यानंतर घरातील साैंदर्यप्रसाधनांसह २० हजारांची राेकडही लांबविली. ही घटना उघडकीस आल्यानंतर काकडे यांनी १६ मार्च राेजी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरूद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.