शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

बस चालकाच्या मुलाने सर केलं ‘UPSC’ चे शिखर; शशिकांत नरवडेने मिळवली ४९३ वी रँक

By बाबुराव चव्हाण | Published: May 24, 2023 6:55 PM

पाच वेळा अपयश तरी सोडली नाही जिद्द

तुळजापूर : पाच वेळा अपयश तरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील मसला (खु.) येथील शशिकांत दत्तात्रय नरवडे याने देशात ४९३ वी रँक मिळवून ‘लहरों से डरकर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती’, या कवितेच्या ओळी खऱ्या करून दाखविल्या आहेत. वडील सेवानिवृत्त बसचालक व डॉक्टर भाऊ यांनी दिलेल्या बळावर जिद्दीने शशिकांतने यश संपादन केले आहे.

शशिकांत यांचे १ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण वैराग येथील तुळशीदास जाधव प्रशालेत झाले. दहावीत १०० टक्के गुण प्राप्त केले होते. यानंतर शशिकांतने महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील शाहू कॉलेजमधून झाले. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने बॅंकेकडून अडीच लाखांचे कर्ज घेऊन ‘बी-टेक’ पूर्ण केले. यानंतर २०१७-२०२० या कालावधीत पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०१७ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. परंतु, अपेक्षित यश मिळाले नाही. २०२०-२०२१ मध्ये ‘सारथी’च्या स्कॉलरशीपच्या सहाय्याने दिल्ली येथे राहून वर्षभर अभ्यास केला. 

मात्र, यानंतर आर्थिक चणचण अधिक तीव्र झाली. त्यामुळे पुन्हा पुणे गाठले. येथे खाजगी क्लासेसमध्ये ‘लेक्चर’ म्हणून काम सुरू केले. यातून मिळणार्या पैशातून अभ्यास सुरू ठेवला. तीनवेळा मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. परंतु, यश काही हाती लागले नाही. पाचव्या प्रयत्नात तर अवघ्या एका गुणाने यशाने हुलकावणी दिली. मात्र, यानंतरही त्यांनी जिद्द साेडली नाही. उलट अभ्यास वाढवला. सलग पंधरा तास अभ्यास करून सहाव्या प्रयत्नात ‘युपीएससी’चे शिखर सर केले. शशिकांत यांचे हे प्रयत्न, चिकाटी अन् जिद्द स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या इतर विद्यार्थ्यांत उत्साह भरणारी ठरेल.

संकटाशी दाेन हात केले अन....शशिकांत यांचे वडील दत्तात्रय नरवडे यांनी १२ वी पर्यतचे शिक्षण पूर्ण करून राज्य परिवहन महामंडळाच्या बार्शी आगारात बस चालक नाेकरी केली. ते २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले. तर आई सुनंदा नरवडे यांचे नववी पर्यंच शिक्षण झाले आहे. त्या गृहिणी आहेत. अशा प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत शशिकांत यांचा माेठा भाऊ श्रीराम नरवडे यांनी ‘एमबीबीएस’, ‘एमडी’ पूर्ण केले. सध्या ते तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत आहेत. भावाच्या पावलावर पााऊल ठेवत संकटाचा सामना करीत शशिकांत यांनीही ‘युपीएससी’चे शिखर सर केले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगOsmanabadउस्मानाबाद