कळंब : आपण पाहतो की आपली रक्षा करावी या अर्थाने बहिणीने भावाला राखी बांधण्याची परंपरा ही चालत आलेली आहे. त्यालाच आपण रक्षाबंधन असे म्हणतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा असलेले व न थकता अहोरात्र जनतेची सेवा करत अनेक बहिणींची, भावांची नव्हे, तर सर्व जनतेचीच कोरोनापासून रक्षा करत असलेले उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांना पर्यावरणपूरक राख्या बांधून इनरव्हील क्लब कळंब यांनी बुधवारी रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनंदा अनिगुंटे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, रोटरी क्लब कळंब सिटीचे अध्यक्ष धर्मेंद्र शहा, सचिव अरविंद शिंदे हे उपस्थित होते, तर कार्यक्रमासाठी ट्रेझरर मीनाक्षी भंवर, रेखा तीर्थकर, मेघा आवटे, राजश्री देशमुख, वर्षा जाधव तसेच सुशील तीर्थकर त्याच प्रकारे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. जोशी प्रशांत, डॉ. सुधीर शिंदे, डॉ. शरद दशरथ, डॉ. सुधीर आवटे, डॉ. स्वप्नील शिंदे, डॉ. कोठावळे, तसेच सुनंदा गोस्वामी, श्यामल गोसावी, संगीता थिटे, ईश्वर भोसले, विजय यादव, परशुराम कोळी, तानाजी कदम, किरण मुंडे, वरपे वाचमन, पांडुरंग जाधव, पारवे प्रवीण, नासीर शेख, अमोल बनसोडे, पांडुरंग जाधव, सुधाकर गायकवाड, सोनकांबळे, यादव, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी भवर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. शरद दशरथ यांनी केले.
प्रतिक्रिया
पर्यावरणपूरक राखी बांधण्याचा उद्देश म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे बी आहे. या जर बिया लावून त्यांची जपणूक केली, तर नक्कीच झाडाच्या संख्येमध्ये वाढ होईल व त्यामुळे ऑक्सिजन वाढेल आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश जाईल.
-रेखा तीर्थकर