प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी किशोर कुलकर्णी यांनी या दिनाचे औचित्य साधत गावा-गावात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती तसेच वृक्षारोपण, मंदिर व सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी हभप विष्णूपंत मुंडे (अणदूर), हभप अण्णाराव बिराजदार (हिप्परगा), हभप परमेश्वर शिंदे (धुत्ता), लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, दत्तात्रय सलगरे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रमोद पोतदार, दत्तात्रय दंडगुले, बालाजी चव्हाण, महेश कुंभार, शहाजी जाधव, शिवशंकर हत्तरगे, सचिन रसाळ, युवराज जाधव, किशोर होणाजे, अविनाश बलसुरे, अमर कोळगे, मारुती पांचाळ, अरविंद जावळे, अनिरुद्ध कारभारी, संतोष पाटील, राजकुमार शिनगारे, नरहरी क्षीरसागर, रमेश पाटील, शंकर जगताप, हनुमंत रसाळ, दीपक दरेकर, शैलेश नकाशे, यांच्यासह रा.स्व. संघ, वि.हीं. प. बजरंग दल, भाजपा आदी संघटनेचे जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विक्रम साळुंके, प्रास्तविक श्रीकृष्ण धर्माधिकारी यांनी केले. अभार जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चवरे यांनी मानले.
विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:10 AM