उस्मानाबाद : येथील जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. मेघा शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, कृषी अधिकारी निरडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चौगुले, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी कवठे यांच्यासह प्रशासन अधिकारी (आरोग्य) उइके उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. मेघा शिंदे यांनी श्री संत सेवालाल महाराज यांचे विचार सभागृहासमोर मांडले. तेलंगणा राज्यातील गोगालडोडी (ता. गुत्ती, जिल्हा अनंतपूर) येथे संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला. महाराज निरक्षर असूनदेखील त्यांनी समाजप्रबोधनासाठी संत वचने दोहे सोप्या आणि सरळ अशा बंजारा बोलीभाषेत मांडली. अंधश्रद्धा, व्यसनाधीनता,भोळ्या समजुती दूर होण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने लिहिली, असे त्या म्हणाल्या.