उस्मानाबाद -आपल्या गळ्यातील दागिने चाेरीस गेल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने आरडाओरड केली. बाजूलाच असलेल्या साध्या पाेशाखातील पाेलिसांनी तप्तरता दाखवित, गर्दीतील चार संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चाैकशी केली असता, चाेरीचे दागिने त्यांच्याकडे आढळून आले. यानंतर त्यांना बेड्या ठाेकल्या. या चारही महिला पुणे येथील रहिवासी आहेत. ही कारवाई २४ ऑगस्ट राेजी करण्यात आली.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, औसा तालुक्यातील वरवडा येथील वैजंताबाई नागुराव शिंदे या २४ ऑगस्ट राेजी दुपारी १२ वाजता तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या हाेत्या. शहाजी महाद्वारासमाेरून दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील २ ग्रॅम वजनाचे साेन्याचे मंगळसूत्र अज्ञाताने हिसकावताच, त्यांनी आरडाओरड केली. हा प्रकार मंदिरासमाेरील साध्या पाेशाखातील पाेलिसांच्या लक्षात आला. त्यांनी तप्तरता दाखवित गर्दीतील संशयित महिलांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चाैकशी केली असता, त्यांच्याकडे चाेरीचे दागिने आढळून आले. या चारही महिला पुणे येथील रहिवासी आहेत. शारदा जाधव, काेमल गायकवाड, वैशाली गायकवाड व मीना गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी तुळजापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.