सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. याचाच गैरफायदा काही कर्मचारी घेत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, काही लॅब चालकांचे नातेवाईक रुग्णालयात कामाला असल्याने त्यांच्याकडून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील रुग्णांकडून केला जात आहे. त्यामुळे याच्या चौकशीची मागणी रुग्णांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील काही लॅबला सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, कुठेही अहवालनिहाय दराचे फलक दिसून आले नाहीत. तसेच चाचण्या केलेली बिले देखील मिळत नसल्याचे रुग्णांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत वैद्यकीय अधिकारी संदीप जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामीण रुग्णालयात आम्ही गरज असेल तरच रुग्णाला चाचणी करण्यास सांगतो. आम्ही न सांगता असे कुणी करीत असेल तर त्यावर नक्की कारवाई करू.
गरज नसताना तपासण्या; रुग्णांची प्रशासनाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:35 AM