विधिज्ञ मंडळात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. नितीन भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. मिलिंद पाटील यांची उपस्थिती हाेती.
यावेळी नितीन भोसले बार काैन्सिल व बेंच या दाेघांना मिळून समन्वयातून काम केले तर न्यायालयीन कामकाजात आणखी सुसूत्रता आणता येईल. तसेच काेविड काळात न्यायालयीन कामकाजात बराच खंड पडला आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणीही त्यांनी मांडली. यानंतर बाेलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेटकर यांनी विधिज्ञ मंडळास पूर्णपणे सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी ॲड. मिलिंद पाटील यांनीही मनाेगत व्यक्त केले. यावेळी न्या. पेटकर यांच्या हस्ते नॅशनल लाॅ युनिव्हर्सिटीसाठी निवड झालेले विनय विजय माने, तेजस राेहिदास तांदाळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश नेर्लेकर, मखरे, जगताप, विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अतुल देशमुख, के. बी. डेंगळे, सचिव तानाजी चौधरी, कोषाध्यक्ष भाग्यश्री कदम, सचिव प्रवीण शेटे अरुणा गवई, महिला प्रतिनिधी आकांक्षा माने, अश्विनी सोनटक्के आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन ॲड. तानाजी चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. प्रवीण शेटे यांनी मानले.