उमरगा (जि़उस्मानाबाद) : येथील एका कुटुंबाने १४ वर्षीय बालिकेचा विवाह निश्चित केला होता़ मात्र, तत्पूर्वीच याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची गुरुवारी दुपारी भेट घेऊन त्यांना कायद्याची माहिती दिली़ तब्बल ७ तास झालेल्या चर्चेनंतर रात्री अखेर ते कुटुंब बालविवाह थांबविण्यास राजी झाले अन् ‘त्या’ अल्पवयीन मुलीची बालदिनी बालविवाहातून सुटका झाली़संबंधित कुटुंबाने २० नोव्हेंबरला विवाह नियोजित केल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीस मिळाली होती़ समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या माध्यमातून प्रयत्न केले.
उस्मानाबादला बालदिनीच टळला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 4:29 AM