शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

मुलाच्या दोन्ही किडनी फेल, आई देण्यास तयार पण प्रत्यारोपणासाठी पैसे नाहीत; दानशूरांची गरज

By बाबुराव चव्हाण | Published: August 12, 2023 6:19 PM

मजूर कुटुंबाची व्यथा; पोटच्या गोळ्याला वाचविण्याची पालकांची धडपड

- दत्ता पवारयेडशी (जि. धाराशिव) : प्रथमेशच्या जन्मानंतर घरात आनंदाचे वातावरण हाेते. मात्र, अवघ्या ११ महिन्यांतच प्रथमेशची एक किडनी निकामी झाल्याचे डाॅक्टरांनी निदान केले अन् आनंदावर विरजण पडले. ही किडनी काढून टाकल्यानंतर ताे आजवर एकाच किडनीवर हाेता. मात्र, काही दिवसांपूर्वी दुसऱ्या किडनीनेही साथ साेडली. आता त्याच्या आयुष्याची दाेरी ‘डायलिसिस’वर निर्भर आहे. पाेटच्या गाेळ्याला जीवनदान देण्यासाठी आईने किडनी देऊ केली. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ५ लाखांअभावी किडनी प्रत्यारोपण थांबले आहे. प्रथमेशला जीवनदान देण्यासाठी आता गरज आहे, ती समाजातील दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची.

दत्तात्रय सस्ते यांची काैटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गावातीलच एका हाॅटेलमध्ये मजूर म्हणून काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. प्रथमेशचा जन्म झाल्यानंतर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण हाेते. मात्र, अकराव्या महिन्यांतच प्रथमेशची एक किडनी फेल झाल्याचे डाॅक्टरांनी निदान केले अन् सस्ते कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ही किडनी काढून टाकण्यात आली. तेव्हापासून प्रथमेश एकाच किडनीवर हाेता. या काळात त्याने दहावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.

सर्वकाही बऱ्यापैकी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वीच प्रथमेच्या दुसऱ्या किडनीनेही त्याची साथ साेडली. तेव्हापासून प्रथमेश ‘डायलिसिस’वरच आहे. डाॅक्टरांनी किडनी प्रत्याराेपणाचा सल्ला दिल्यानंतर पाेटचा गाेळ्यास जीवनदान देण्यासाठी आई अश्विनी सस्ते यांनी आपली किडनी देऊ केली. मात्र, रुग्णालयाकडून प्रत्याराेपणासाठीचा खर्च तब्बल ५ लाख रुपये सांगण्यात आला. जिथं दिवसभर काम केलं तर चूल पेटते, तिथं ५ लाख आणायचे काेठून, असा प्रश्न दत्तात्रय यांच्यासमाेर उभा ठाकला. आपल्या पातळीवर त्यांनी प्रयत्नही केले. मात्र, पैसे काही जमले नाहीत. त्यामुळे प्रथमेश आजही ‘डायलिसिस’वरच आहे. त्याला जीवनदान देण्यासाठी आता गरज आहे ती, समाजातील दानूशर व्यक्तींच्या मदतीची. इच्छुक ९३०७५६९९२१ या माेबाईल क्रमांकावर दत्तात्रय सस्ते यांच्याशी संपर्क करू शकतात.

दानशूर व्यक्तींनी मदत करावी...सतरा वर्षाचा मुलगा दाेन्ही किडन्या निकामी झाल्याने डायलिसिसवर आहे. त्याच्या आईने किडनी देऊ केली आहे. मात्र, रुग्णालयाकडून पाच लाखांचा खर्च सांगितला आहे. मी हाॅटेलमध्ये मजूर म्हणून काम करून कुटुंब कसंबसं चालविताे. त्यामुळे एवढे पैसे आणणार काेठून?. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने आर्थिक मदत करावी, असे आवाहन दत्तात्रय सस्ते यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादHealthआरोग्य