तुळजापूर - काेराेना लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी वेगवेगळ्या प्रभागात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन राेचकरी यांनी केले.
शहरातील सराया धर्मशाळेतील लसीकरण केंद्राचे उद्घाटन गुरुवारी झाले. याप्रसंगी ते बाेलत हाेते. नगरसेवक पंडित जगदाळे, माजी नगराध्यक्ष गणेश कदम, माजी नगरसेवक नाना लोंढे, अभिजित कदम, ज्येष्ठ नागरिक श्याम क्षीरसागर, कालिदास चिवचिवे, अमर कदम, चंद्रकांत लोंढे चिवचिवे, दिगंबर कदम, रुग्ण समितीचे सदस्य आनंद कंदले यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
राेचकरी म्हणाले की, सध्या काेराेनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे काहील लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या काेराेनाचा संसर्ग ओसरला असला तरी धाेका टळलेला नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने लस टाेचून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यावतीने भेटवस्तू म्हणून टिफिन डबा, अल्पोपहार वाटप करण्यात आले. याप्रसंगी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, नानासाहेब डोंगरे, सचिन कदम, उपजिल्हा रुग्णालय येथील लसीकरण प्रमुख सुलक्षणा मोरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंचला बोडके, श्रीधर जाधव यांनी लसीकरण केंद्रस भेट दिली. सदरील लसीकरण यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.