तुळजापूर : जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी येथील उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
आगामी काळात कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता विचारात घेऊन औषधे, डॉक्टर संख्या व इतर कोविडविषयक साहित्य मागणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यानंतर त्यांनी आठवडी बाजार येथील कोविड सेंटरला भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. या ठिकाणची कूपनलिका बंद असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर बंद कूपनलिका चालू होत नसेल तर या ठिकाणी तात्काळ नवीन कूपनलिका घ्या. तोपर्यंत येथील रुग्णांना व कर्मचाऱ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, तहसीलदार सौदागर तांदळे, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. जाधव व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.