डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयात सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ‘ब्रिज कोर्सेस’ सुरू करण्यात येत आहेत. याचा अभ्यासक्रम गठित करण्यासाठी विद्यापीठ अंतर्गत विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कॉमर्स या विषयांमध्ये सेतू अभ्यासक्रमावर चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी जिल्ह्यातील वाणिज्य विभागातील प्राध्यापकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याचे उद्घाटन विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. जयसिंग देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य आणि समन्वयक डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डी. व्ही. थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सुयोग अमृतराव, प्राचार्य डॉ. चंदनशिव, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. पी. एस. माने, डॉ. सी. व्ही. पवार, अजित आष्टे, डॉ. व्ही. एस. शिंदे, डॉ. राम सोलंकर, डॉ. आर. डी. गायकवाड, डॉ. एस. व्ही. पंचकल्ले आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. विनोद देवरकर, प्रास्ताविक डॉ. अस्वले यांनी केले. आभार डॉ. केशव लेंगरे यांनी मानले.