जून महिन्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून खत व बियाणे घेऊन पिकांची पेरणी केली. यामध्ये सर्वाधिक १५७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर मूग १० हेक्टर, तूर ३७ हेक्टरवर, उडीद १० हेक्टर पेरणी झाली. यातच सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हजारो रुपये खर्च करून फवारणी केली. परंतु, गेल्या २५ दिवसांपासून पाऊस न पडल्याने सोयाबीनसह सर्व पिके जळू लागली आहेत. आता पाऊस पडला तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे असून, पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मधुकर लवटे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस फवारणी करावी. शक्य असल्यास पाणी द्यावे. तसेच नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे तातडीने द्यावी, असे आवाहन कृषी सहाय्यक महादेव देवकर यांनी केले आहे.
पंचनामे करून भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:33 AM