मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार; अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एक नेता भाजपाच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 08:58 PM2024-02-26T20:58:42+5:302024-02-26T20:59:14+5:30

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत.

Congress leader basavraj patil to leave congress, will join BJP soon | मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार; अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एक नेता भाजपाच्या वाटेवर

मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार; अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एक नेता भाजपाच्या वाटेवर

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (Basavraj Patil) भाजपच्या वाटेवर आहेत. ते मंगळवारी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून, उद्याच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

धाराशिव जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ राहिलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा मागील काही महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. अखेर त्यास मंगळवारचा मुहूर्त निघाला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून मिळाली.

दरम्यान, धाराशिव लोकसभेची जागा भाजपाला सुटल्यास बसवराज पाटील हे उमेदवारीचे दावेदार असू शकतात. किंबहुना महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, त्यास त्यांचे चांगले बळ मिळू शकते. मात्र, पाटील यांनी अशी कोणतीही मागणी, कोणाकडेही केली नसल्याचे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Congress leader basavraj patil to leave congress, will join BJP soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.